नवी दिल्ली : रिलायन्स जिओने ३१ डिसेंबर पर्यंत फ्री कॉल आणि फ्री इंटरनेट देण्याची ऑफर दिली असताना आता या फ्री इंटरनेटच्या युद्धात एअरटेलने उडी घेतली आहे. आता एअरटेल आपल्या ग्राहकांना तीन महिने अनलिमिटेड हायस्पीड इंटरनेट देणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एअरटेलच्या नव्या ६० हजार कोटीच्या प्रकल्पात ग्राहकांना १०० एमबीपीएसपर्यंत स्पीड देण्यात येणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. 


एअरटेलच्या नव्या तंत्रज्ञानाचे नाव आहे व्ही-फायबर, ज्यामुळे ८७ शहरांतील इंटरनेट स्पीड वाढू शकतो. यासाठी ग्राहकांना आपल्या जुन्या मॉडेमला बदलण्यासाठी १००० रुपये द्यावे लागणार आहे. 


सेवा आवडली नाही तर पैसे परत...


एअरटेलने सांगितले की ग्राहकाला स्पीड आवडला नाही तर त्याचे पैसे परत दिले जाणार आहे. एअरटेलचा तीन महिन्याची ऑफर ट्रायलमध्ये देण्यात आली आहे.  तसेच एअरटेलने आपल्या ब्रॉडबँड ग्राहकांना संपूर्ण देशात फ्री व्हॉईस कॉलची सुविधा देण्यात येणार आहे. 


कुठे मिळणार ही सुविधा 


सध्या ही सुविधा चेन्नईमध्ये सुरू करण्यात आली आहे. आगामी काळात ती दिल्ली, एनसीआर आणि मुंबईत लागू करण्यात येणार आहे. त्यानंतर संपूर्ण देशात देण्यात येणार आहे.