बंगळुर : येथील एका तरुणाने फेसबूक आणि ट्विटरला त्यांच्या त्रुटी दाखवून दिल्यात. याबद्दल या तरुणाला कोट्यवधी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे या प्रोग्रामरने फेसबुक आणि ट्‌विटरला वेगवेगळ्या त्रुटी दाखवून आतापर्यंत १ कोटी पेक्षा अधिक रकमेचे बक्षीस कमावले आहे.


आनंद प्रकाश हा २३ वर्षांचा तरुण. आनंद हा फ्लिपकार्टमध्ये सिक्‍युरिटी इंजिनिअर म्हणून काम करत आहे. फेसबूकवरील कोणत्याही युजरचे खाते हॅक करता येत असल्याची त्रुटी त्याने शोधली आणि ती फेसबुकला दाखवून दिली.


आनंदने आतापर्यंत फेसबूकमधील ९० तर ट्‌विटरमधील ३० उणिवा दाखवून दिल्या आहेत. यात्याच्या कामगिरीमुळे त्याला आतापर्यंत बक्षीस म्हणून १ कोटी २० लाखापर्यंत रकम मिळाली आहे.


आनंदने 'ब्रुट फोर्स अल्गोरिदम'चा वापर केला. ही पद्धत वापरून कोणीही अगदी सहजपणे एखाद्याच्या फेसबूक खात्यात प्रवेश करू शकतो. तसे त्यांने आपल्या ब्लॉगमध्ये माहिती देताना त्याने म्हटलेय, अशाप्रकारे एखाद्याचे खाते हॅक करून त्यातील डेबिट किंवा क्रेडिट कार्डची माहिती, खासगी चित्रे, संदेश आदी सर्व प्रकारची माहिती सहजपणे पाहता येणे शक्‍य आहे.