अनिल अंबानींच्या आरकॉमची होळी ऑफर, ४९ रुपयांमध्ये १ जीबी डेटा
मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी अनिल अंबानींची आरकॉम म्हणजेच रिलायन्स कम्युनिकेशन्सनं खास होळीनिमित्त ग्राहकांसाठी नवी ऑफर आणली आहे.
मुंबई : मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी अनिल अंबानींची आरकॉम म्हणजेच रिलायन्स कम्युनिकेशन्सनं खास होळीनिमित्त ग्राहकांसाठी नवी ऑफर आणली आहे. आरकॉम त्यांच्या 4G ग्राहकांना ४९ रुपयांमध्ये १ जीबी डेटा देणार आहे. इंटरनेट डेटा सोबतच ग्राहकांना अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंगही मिळणार आहे.
आरकॉमनं फक्त 4Gचं नाही तर 2G आणि 3Gसाठीही वेगवेगळ्या ऑफर आणल्या आहेत. आरकॉमच्या 3G ग्राहकांना ९९ रुपयांमध्ये अनलिमिटेड डेटा आणि 2G ग्राहकांना ४९ रुपयांमध्ये अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. या सगळ्या सुविधा २८ दिवसांसाठी मर्यादित असणार आहेत. जॉय ऑफ होली असं आरकॉमच्या ऑफरचं नाव आहे.