आरक्षणविरोधी पंख्याची जाहिरात मागे घेतली
मुंबई : एका पंख्याच्या कंपनीची जाहिरात ही आरक्षण विरोधी झाली आहे. या जाहिरातीवर सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर ही जाहिरात मागे घेण्यात आली आहे.
देशात रोहित वेमुल्लाच्या आत्महत्येनंतर देशात असलेल्या एकूण वातावरणात अशी जाहिरात प्रसिद्ध झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान कंपनीने आपल्याला कुणाच्याही भावना दुखवण्याचा उद्देश नव्हता आणि या जाहिरातीचा तसा उद्देश नव्हता, तसेच ही जाहिरात आपण मागे घेत असल्याचं या कंपनीने म्हटलं आहे.