मुंबई : पोकेमॉन गोची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अॅपल कंपनी येत्या १ ते २ वर्षात अब्ज डॉलर कमवेल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पोकेमॉन खेळणारे जास्त फीचर्स मिळावे म्हणून अॅपस्टोअर मधून पोकेकॉइन्स विकत घेतात. त्यामुळे अॅपल यामधून भरपूर नफा कमवणार असल्याचं म्हटलं जातं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अॅप स्टोअरवर १०० पोकेकॉइन्ससाठी 99 सेंट्स मोजावे लागतात, तर 14,500 पोकेकॉइन्स घेण्यासाठी 99.99 डॉलर्स लागतात. गेम मोफत डाऊनलोड होत असला तरी जास्तीच्या फीचर्ससाठी पोकेकॉइन्स विकत घ्यावी लागतात. अॅप स्टोअरच्या माध्यमातून पोकेमॉन गोसाठी केलेल्या खरेदीपैकी 30 टक्के रक्कम अॅपल घेत असल्याचा अंदाज नीधाम अँड कंपनी ब्रोकरेज फर्मचे अॅनालिस्ट लॉरा मार्टिन यांनी व्यक्त केला आहे. लाँच झाल्यानंतरच्या पहिल्या दोन आठवड्यातच पोकेमॉनच्या फक्त अमेरिकेतील अॅक्टिव युजर्सची संख्या 2.1 कोटी झाली.


पैसे भरून किती जणांनी पोकेमॉन घेण्याऱ्यांची संख्या ही कँडी क्रशपेक्षा १० पट जास्त आहे. २ वर्षापूर्वी कँडी क्रश भरपूर गाजला होता. त्याने 1 अब्ज डॉलर्सचं उत्पन्न मिळवून दिलं होतं. पोकेमॉन गो या बाबतीतही कँडी क्रशचा रेकॉर्ड मोडेल असा अंदाज आहे. फेसबूक किंवा व्हॉट्स अॅपपेक्षा जास्त वेळ अमेरिकेतील यूजर्स पोकेमॉनवर घालवत असल्याचंही समोर आलं आहे.


पोकेमॉन गो लाँच झाल्यानंतर एकूणच मोबाईलशी संबंधित उपकरणांच्या विक्रीमध्ये वाढ झाल्याचंही आढळलं आहे. या सगळ्याचा परिणाम शेअर बाजारात दिसून आला असून अॅपलच्या शेअरचा भाव दोन आठवड्यात सुमारे 5 टक्क्यांनी वाढला आहे.