एप्रिल फुलच्या दिवशी घडलेल्या खऱ्या घटना
एप्रिलच्या पहिल्या दिवशी तुम्हाला कोणी काही सांगितले तर आपल्याला एप्रिल फुल बनवत असेल असे म्हणून आपण दुर्लक्ष करतो.
मुंबई: एप्रिलच्या पहिल्या दिवशी तुम्हाला कोणी काही सांगितले तर आपल्याला एप्रिल फुल बनवत असेल असे म्हणून आपण दुर्लक्ष करतो. मात्र यामुळे अनेकदा खऱ्या घटनांनानाही लोक एप्रिल फुल समजतात. एक एप्रिलच्या दिवशी अशा काही घटना घडल्यात ज्यामुळे लोकांचे मोठे नुकसान झालेय
एप्रिल फुलच्या दिवशी घडलेल्या खऱ्या घटना
गुगलने एक एप्रिल २००४मध्ये जीमेल लाँच केले होते. मात्र लोकांना ही गंमत वाटली.
१ एप्रिल २००७मध्ये गुगलने न्यूयॉर्क सिटी ऑफिसमध्ये असं सांगितलं होत की बिल्डींगमध्ये अजगर फिरतोय. मात्र तेथील कर्मचाऱ्यांनी ही गोष्ट गमतीने घेतली.
३१ मार्च १९४६मध्ये अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी हवाई आणि एलुइतन बेटावर त्सुनामी येण्याची पूर्वसूचना दिली होती. मात्र एप्रिल फुल समजून लोकांनी याकडे दुर्लक्ष केले. या त्सुनामीमुळे १६५ जणांना जीव गमवावा लागला.
१ एप्रिल १९४७ रोजी किंग जॉर्ज यांचे निधन झाले मात्र लोकांना ही एप्रिल फुलची गंमत वाटली.