नवी दिल्ली :  मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा परिणाम आता जागोजागो दिसून येतो. काही ठिकाणी पैसे जाळून टाकण्यात आले. तर काही ठिकाणी पैसे कचऱ्याच्या डब्यात सापडले. असा एक फोटो सध्या टिटवाळ्यात एका कचरा कुंडीजवळ ५०० आणि १००० च्या नोटा एका गोणीत पडल्याचा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका कचरा कुंडीच्या बाजुला एका खाकी कलरच्या पोत्यात १००० आणि ५०० रुपयांची नोटा भरलेला फोटो दिसत आहे.


काय आहे सत्य...


हा फोटो बनावट असून तो व्हॉट्सअॅप, फेसबूक आणि ट्विटरवर फिरत आहे. टिटवाळ्यातील फोटोत म्हटले आहे की डीएनएस बँकेच्या बाहेर असलेल्या कचरा कुंडीजवळ या नोटा सापडल्या आहेत. पण हाच फोटो विविध व्हॉट्सअॅप ग्रुपवर वेगवेगळ्या शहरांचे नावाने आणि बँकांचे नाव बदलून फिरत आहे. पुण्यात हा फोटो पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या नावाने फिरत आहे.


झी मीडियाने उघड केले सत्य...


अशा प्रकारे बातमी व्हायरल होत असताना झी मीडियाने या बातमीचा माग घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसाार विविध शहरातील स्थानिक प्रतिनिधींना या ठिकाणी पाठविण्यात आले. पण कोणत्याच ठिकाणी अशा नोटा सापडल्याचे वृत्त नव्हते.


सीसीटीव्ही खंगाळले...


या संदर्भात ज्या बँकेच्या आसपास कचरा कुंडी आहेत. तेथील सीसीटीव्हीची तपासणीही पोलिसांच्या मदतीने करण्यात आली. पण अशी गोणी कुठेच कधीच नसल्याचे स्पष्ट झाले.  


व्हायरल करण्यापूर्वी विचार करा... 


पण हा फोटो खरा आहेत का याची सत्यता कोणीही तपासत नाही आणि फोटो फॉरवर्ड करीत आहेत. आपल्याला असा फोटो आला तर त्याची सत्यता सिद्ध झाल्या शिवाय कृपया फॉरवर्ड करू नका...