एटीएमचा पिन बदलण्याचे बँकांचे आदेश
तुम्ही जर एटीएम कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सुरक्षिततेसाठी एटीएमचा पिन बदलण्याचे आदेश काही बँकांनी आपल्या ग्राहकांना दिलेत.
मुंबई : तुम्ही जर एटीएम कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सुरक्षिततेसाठी एटीएमचा पिन बदलण्याचे आदेश काही बँकांनी आपल्या ग्राहकांना दिलेत.
नुकत्याच एटीएमसंदर्भात फसवणुकीच्या घटना समोर आल्याने ग्राहकांना एटीएम पिन बदलण्याचे आदेश काही बँकांनी दिलेत. एचडीएफसी, फेडरल तसेच डीबीएसने आपल्या ग्राहकांना पिन बदलण्याचे आदेश दिलेत.
काही दिवसांपूर्वीच बँकाचा डेटा चोरी झाल्याची बातमी पसरली होती. यावर एनपीसीआयने स्पष्टीकरण देताना बँकांचा डेटा सुरक्षित असल्याचे म्हटलेय. दरम्यान, सुरक्षिततेसाठी वेळोवेळी एटीएमचा पिन बदलण्याचे आदेश बँकांनी दिलेत.