मुंबई : ऑनलाईन खरेदी करताना काही गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात, त्यापैकी दोन गोष्टी आम्ही तुम्हाला येथे थोडक्यात सांगतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१) तुम्ही ज्या वस्तूची खरेदी करतायत, तर त्या वस्तूला वॉरंटी नेमकी मॅन्यूफॅक्चरची आहे की रिटेलरची, ते नीट पाहा.
रिटेलरने ठेवली असेल, तर अत्यंत सावधानता ठेवा, इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल तर सहसा टाळलेलं बरं, कारण याची वॉरंटी फारच कमी असते. 


प्रत्यक्षात संबंधित कंपनीने (मॅन्यूफॅक्चर) विक्रीस ठेवली असल्यास त्याची विश्वासार्हता अधिक असते.


उदाहरणार्थ - सॅमसंगचा फोन सॅमसंग कंपनीने विक्रीस ठेवली असेल तर विश्वासार्हता वाढते, मात्र रिटेलरने सॅमसंगचा फोन विक्रीस ठेवला असेल तर रिटेलरची रँकिंग पाहा.


२) रिटेलर म्हणजे जे इतर कंपन्यांच्या वस्तू स्टॉकमध्ये घेऊन ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांच्या वेबसाईटवर विकतात ते. रिटेलरला किती स्टार आहेत ते पाहा. 


स्टार पाहताना हे लक्षात घ्या, या रिटेलरने किती वस्तू विकल्या आहेत, चार-पाच वस्तू विकून रिटेलरला अधिक चांगले स्टार मिळतात. मात्र खूप मोठ्या प्रमाणात वस्तू विक्री केल्यानंतर ज्या रिटेलर्सला चांगले स्टार आहेत, त्यांच्या वस्तू घेण्यास हरकत नाही. म्हणजे ५०० वस्तू विकून एखादी तक्रार असेल तर ठिक असू शकते.


संबंधित वस्तू रिटेलरने किंवा प्रत्यक्षात संबंधित कंपनीने म्हणजेच मॅन्यूफॅक्चर विक्रीस ठेवली आहे का? हे प्रत्येक ऑनलाईन वेबसाईटवर वस्तूची माहिती देताना नमूद केलेले असते.