पार्टनरला हे गिफ्ट देऊन करा इंप्रेस
पुरुषांना गिफ्ट देणं हे सगळ्यात कठीण काम. त्यांना नेमके काय द्याव हाच नेमका प्रश्न असतो. अनेकांना वाटते की महिलांना गिफ्ट घेणे हे पुरुषांसाठी गिफ्ट घेण्याच्या तुलनेत सोपे असते. साधारणपणे पुरुषांना गॅजेट्स, प्ले स्टेशन, मोबाईल अथवा टाय वगैरे अशा गिफ्ट दिल्या जातात. तुमच्या पार्टनरला तुम्हाला इंप्रेस करायचे असल्यास याव्यतिरिक्तही तुम्ही दुसरं गिफ्टही देऊ शकतात. हे आहेत गिफ्टचे काही पर्याय जे तुम्ही तुमच्या पार्टनरला देऊन इंप्रेस करु शकता.
मुंबई : पुरुषांना गिफ्ट देणं हे सगळ्यात कठीण काम. त्यांना नेमके काय द्याव हाच नेमका प्रश्न असतो. अनेकांना वाटते की महिलांना गिफ्ट घेणे हे पुरुषांसाठी गिफ्ट घेण्याच्या तुलनेत सोपे असते. साधारणपणे पुरुषांना गॅजेट्स, प्ले स्टेशन, मोबाईल अथवा टाय वगैरे अशा गिफ्ट दिल्या जातात. तुमच्या पार्टनरला तुम्हाला इंप्रेस करायचे असल्यास याव्यतिरिक्तही तुम्ही दुसरं गिफ्टही देऊ शकतात. हे आहेत गिफ्टचे काही पर्याय जे तुम्ही तुमच्या पार्टनरला देऊन इंप्रेस करु शकता.
एखाद्या सोहळ्याचे तिकीट - जर तुमच्या मनात तुमच्या पार्टनरला काही खास गिफ्ट देण्याचे मनात असेल तर एखाद्या कार्यक्रमाचे तिकीट देऊ शकत.अनेक पुरुषांना कॉन्सर्टला जायला आवडते. जर तुमच्या पार्टनरला म्युझिकची आवड असेल तर म्युझिक कॉन्सर्टचे तिकीट देऊन तुम्ही त्याला इंप्रेस करु शकता.
प्रेमाचे पत्र - हे गिफ्ट तुमच्या पार्टनरसाठी खास आणि रोमँटिक असेल. तुम्हाला वाटत असेल तर की त्याला प्रेमाचे पत्र देऊन तुम्ही पार्टनरला खुश करु शकता. तर हा पर्याय उत्तम आहे.
जुन्या आठवणींची फ्रेम - तुम्हाला पार्टनरला वेगळं काही द्यायच असेल तर जुन्या आठवणींची एखादी फ्रेम देऊ शकता. पार्टनरसोबत घालवलेला एखादा क्षण आठवण म्हणून तुम्ही फ्रेमच्या सहाय्याने त्याला गिफ्ट देऊन इंप्रेस करु शकता.