मुंबई : कोर्टाच्या आदेशानुसार भारत सरकारने मागील काही दिवसांमध्ये हजारो वेबसाइटवर बंदी घातली आहे. ऑगस्ट २०१५ मध्ये सरकारने पोर्नोग्राफिक कंटेट असलेल्या ८५७ साईट्सवर बंदी घातली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंदी घातलेल्या या वेबसाइटवर गेल्यास आतापर्यंत फक्त दंड घेतला जात होता पण आता त्या व्यक्तीला शिक्षा देखील होणार आहे. 


एका मीडिया रिपोर्टनुसार जर तुम्ही बंदी घातलेल्या वेबसाइटवर जाता तर तुम्हाला सूचना मिळतात. तरी तुम्ही त्या साईटमध्ये प्रवेश केला तर तुम्हाला ३ वर्षाची शिक्षा आणि ३ लाख रुपये दंड भरावा लागू शकतो.


'इंडिया टुडे'च्या रिपोर्टनुसार ही शिक्षा फक्त टॉरेंट फाइलला बघितल्यास किंवा भारतात बंदी असलेल्या वेबसाइटवरुन काहीही डाऊनलोड केल्यास होऊ शकते.


रिपोर्टनुसार जर तुम्ही अशा साईट्सवर जाता तर तुम्हाला आधी सूचना मिळते. ती अशी असते.


"This URL has been blocked under the instructions of the Competent Government Authority or in compliance with the orders of a Court of competent jurisdiction. Viewing, downloading, exhibiting or duplicating an illicit copy of the contents under this URL is punishable as an offence under the laws of India, including but not limited to under Sections 63, 63-A, 65 and 65-A of the Copyright Act, 1957 which prescribe imprisonment for 3 years and also fine of upto Rs. 3,00,000/-. Any person aggrieved by any such blocking of this URL may contact at urlblock@tatacommunications.com who will, within 48 hours, provide you the details of relevant proceedings under which you can approach the relevant High Court or Authority for redressal of your grievance"


त्यामुळे अशा सूचनांकडे दुर्लक्ष करु नका. अशी सूचना आल्यास त्या वेबसाईटवर जाणे टाळा.