रिलायन्स जिओच्या नावाने हा मेसेज आला असेल तर...
तुम्हालाही रिलायन्, जिओकडून डेली डाऊनलोड लिमिट वाढवण्याबाबतचा कोणता मेसेज आलाय का? या मेसेजपासून सावध राहा, हा मेसेज केवळ फेक नाहीये तर तुमचा पर्सनल डेटाही चोरीला जाऊ शकतो.
नवी दिल्ली : तुम्हालाही रिलायन्स जिओकडून डेली डाऊनलोड लिमिट वाढवण्याबाबतचा कोणता मेसेज आलाय का? या मेसेजपासून सावध राहा, हा मेसेज केवळ फेक नाहीये तर यामुळे तुमचा पर्सनल डेटाही चोरीला जाऊ शकतो.
सध्या व्हॉट्सअॅप तसेच फेसबुकवर हा मेसेज जोरदार शेअर केला जातोय. यात रिलायन्स यूजर्सना एका लिंकवर क्लिक करण्यास सांगितले आहे. तसेच लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांची डेटा लिमिट १ जीबीने वाढवून १० जीबी करण्यात येईल असे सांगितलेय.
लिंकवर क्लिक केल्यानंतर फोन नंबर, ईमेल अॅड्रेस तसेच अन्य काही माहिती भरायची असते. जेव्हा यूझर ही माहिती भरतो तेव्हा असा मेसेज येतो. Share this with your WhatsApp Groups so they can also Upgarde Jio Service. ज्या लिंकवर हे सगळं होत त्याचा यूआरएल http://upgrade-jio4g.ml/ आहे. यावरुन समजते की ही वेबसाईट फेक आहे. कारण जिओच्या खऱ्या वेबसाईटचा असा यूआरएल नाही.