मुंबई : ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर बिग शॉपिंग डेज सुरु झालेत. ७ ते ९ मार्चदरम्यान हा सेल असणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, टॅब्लेट, लॅपटॉपवर घसघशीत सूट देण्यात आलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयफोन ६ एस - अॅपलचा आयफोन ६एस १६जीबी वेबसाईटवर ४१,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. यावर २१ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देण्यात आलीये. 


नेक्सस पी६ ६४ जीबीचा ३९ हजार ४९९ रुपयांचा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर सेलअंतर्गत ३४ हजार ९९९ रुपयांना मिळतोय.


मोटोरोलाचा मोटो एक्स प्लेची किंमत १६ हजार ९९९ रुपये इतकी आहे. या सेलमध्ये तुम्ही १५ हजार ९९९ रुपयांना हा स्मार्टफोन विकत घेऊ शकाल. 


मायक्रोमॅक्साच कॅनव्हास एक्सप्रेस ४जी या स्मार्टफोन फ्लिपकार्टवर एक्सचेंजशिवाय ६,५९९ रुपयांना मिळतोय. 


लेनोव्हो के३च्या नोटवर एक हजारांची सूट मिळत असून हा स्मार्टफोन ८, ९९९ रुपयांना उपलब्ध आहे.