नवी दिल्ली :  प्रेमात मोठ-मोठ्या बाता करणे सहज शक्य आहे, पण खरंच समोर धोका आला तर आपल्या प्रिय व्यक्तीला वाचविणारे कमी असतात. असा काहीसा प्रकार झिम्बाब्वे येथे एका स्विमिंग पूलमध्ये पाहायला मिळाला. करिबा शहरात एका घरात बनविलेल्या स्विमिंग पूलमध्ये मगर घुसली आणि तिने गर्लफ्रेंडवर हल्ला केला. तेव्हा सर्वात प्रथम तिचा बॉयफ्रेंड पळाला. 


बातमीच्या खाली व्हिडिओ आहे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही तरूणी स्विमिंग पूलमध्ये अंघोळ करत होती तेव्हा अचानक मगरीने हल्ला केला. मगरीने केलेल्या हल्यानंतर आपल्या गर्लफ्रेंडला वाचविण्याऐवजी बॉयफ्रेंड तेथून पळून गेला. तरूणी आपला जीव वाचविण्यासाठी इकडे तिकडे पळत होती. पण मगर तिचा पिच्छा सोडत नव्हती. पण थोड्यावेळेत तिथे उपस्थित एका व्यक्तीने तिचा जीवव वाचवला. त्या व्यक्तीने मगरीचे लक्ष दुसरीकडे केले तेव्हा तरूणीने तेथून आपली सुटका करू घेतली. 


हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला आहे. पाहा व्हिडिओ...