बीएसएनलची जबरदस्त ऑफर, 144 रुपयात महिनाभर अनलिमिटेड कॉल
बीएसनएनएलनं ग्राहकांना परवडेल अशी नवी ऑफर लॉन्च केली आहे.
नवी दिल्ली : बीएसनएनएलनं ग्राहकांना परवडेल अशी नवी ऑफर लॉन्च केली आहे. या ऑफरमध्ये फक्त 144 रुपयांमध्ये ग्राहकांना महिनाभर अनलिमिटेड लोकल आणि एसडीटी कॉल करता येणार आहे. मुख्य म्हणजे कोणत्याही मोबाईल नेटवर्कवर हे कॉल करता येणार आहेत. याबरोबरच 300 एमबी इंटरनेटही मिळणार आहे.
बीएसएनलची ही ऑफर सहा महिन्यांसाठी व्हॅलिड असणार आहे. तसंच प्रिपेड आणि पोस्टपेड या दोन्ही ग्राहकांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. याबरोबरच बीएसएनएल 4,400 ठिकाणी वायफाय हॉटस्पॉटही सुरु करणार आहे.
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी देशभरातल्या सगळ्याच टेलिकॉम कंपनी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेटा पॅकची घोषणा करत आहे. या स्पर्धेमध्ये आता बीएसनएनएलनंही उडी घेतली आहे.