BSNLचा ग्राहकांसाठी धमाका, `फ्री टू होम` सुविधा
सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलने `फ्री टू होम` सुविधा सुरु केलेय. या नव्या सेवेनुसार मोबाईल ग्राहक आपले कॉल्स बीएसएनएलच्या लॅंडलाईनवर मोफत ट्रान्सफर करु शकतील.
नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलने 'फ्री टू होम' सुविधा सुरु केलेय. या नव्या सेवेनुसार मोबाईल ग्राहक आपले कॉल्स बीएसएनएलच्या लॅंडलाईनवर मोफत ट्रान्सफर करु शकतील.
मोबाईलधारक 'फ्री टू होम' या सुविधेच्या माध्यमातून बीएसएनएलच्या लॅंडलाईनवर आता बिनधास्त बोलू शकतात, तेही मोफत. मोबाईलधारक आता घर किंवा कार्यालयातील लॅंडलाईनवर मोबाईल कॉल घेऊ शकतात.