नीट परीक्षेदरम्यान परीक्षाकेंद्रावर कमालीचा गोंधळ
वैद्यकीय महाविद्यालयातल्या प्रवेशाकरताच्या नीट परीक्षेदरम्यान नाशिक परीक्षाकेंद्रावर कमालीचा गोंधळ पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांचया हॉल तिकीटावर दुस-या केंद्राचा पत्ता असल्यानं हा गोंधळ उडाला. त्यामुळे जवळपास 200 विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलं आहे.
मुंबई : वैद्यकीय महाविद्यालयातल्या प्रवेशाकरताच्या नीट परीक्षेदरम्यान नाशिक परीक्षाकेंद्रावर कमालीचा गोंधळ पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांचया हॉल तिकीटावर दुस-या केंद्राचा पत्ता असल्यानं हा गोंधळ उडाला. त्यामुळे जवळपास 200 विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलं आहे.
नाशिकच्या पेठ रस्त्यावरच्या परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. हॉल तिकीटावर मुंडेगाव परीक्षा केंद असं लिहलं होत. त्यामूळे विद्यार्थ्यांना पेठ रोडवरच्या परीक्षा केंद्रावर येण्यासाठी 1 तास उशीर झाला. पाच जिल्ह्यांतून विद्यार्थी इथे आल्यानं त्यांना परीक्षाकेंद्र शोधणं अवघड झालं होतं. त्यामुळे या दोनशे विद्यार्थ्यांना 1 तासाचा वेळ वाढून द्यावा किंवा या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घ्यावी अशी मागणी पालकांनी केली आहे.