मुंबई : आज अनेक लोकांकडे डेबिट आणि क्रेडिट कार्ड आहे. क्रेडिट कार्डचा वापर अनेक लोक सहज करतात. पण जर दक्षतापूर्वक याचा वापर न केल्यास तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर करतांना ७ गोष्टी लक्षात ठेवा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. क्रेडिट कार्ड वापरतांना कधीही उशिर करु नका. तुम्ही जर पेमेंट करत असाल तर लगेचच ते करा त्यामध्ये विलंब लावू नका. पेमेंट करतांना दिलेल्या तारखेच्या आधी पेमेंट करा अन्यथा तुम्हाला दंड बसू शकतो. सोबतच तुमचं क्रेडिट कार्डला नेगेटीव्ह मार्क लागू शकतो. होम लोन किंवा ऑटो लोन दरम्यान क्रेडिट कार्डच्या स्कोरला खूप महत्त्व असतं. त्यामुळे नेगेटिव्ह मार्क लागू देऊ नका. 


२. मिनिमम पेमेंटचा विचार करु नका. सुरुवातीला तुम्हाला ते आकर्षित वाटतं पण नंतर यावर तुम्हाला मोठं व्याज लागतं.


३. ज्यास्त क्रेडिट कार्ड घेऊ नका. याचा वापर फक्त शॉपिंगसाठी असतो. पण लक्षात ठेवा हे मर्यादित काळासाठी असतं. त्याआधी तुम्हाला पेमेंट करावं लागतं. ज्यास्त क्रेडिट कार्ड असल्यास तुम्ही त्याची लास्ट पेमेंड डेट विसरुन जातात आणि तुम्हाला दंड बसतो.


४. घरगुती वस्तूची खरेदी करतांना क्रेडिट कार्डचा वापर करु नका. २०० रुपयाचा शेव विकत घेतांना त्याचं पेमेंट क्रेडिट कार्डने करणं खूप छान वाटतं पण व्याज भरतांना ते महाग पडतं.


५. क्रेडिट कार्ड वापरतांना त्या कंपनीचे टर्म्स अँड कंडिशन लक्षपूर्वक वाचा. अनेक कंपनींचे काही छुपे नियम असतात. ज्याची माहिती अनेकांना नसते.


६. क्रेडिट कार्ड स्टेटमेंट प्रत्येक महिन्याला बघा. कारण यामुळे तुम्हाला माहिती पडतं की तुम्ही कधी आणि काय खरेदी केलं होतं. यामुळे तुम्ही जे व्यवहार केले नाही ते देखील तुम्ही पकडू शकता.


७. क्रेडिट कार्डचा उपयोग कधीही एटीएम सारखा करु नका. कारण याचं व्याज तुम्हाला भरावं लागतं आणि रक्कम ही, त्यामुळे यावर नियंत्रण ठेवा.