एका रुपयात घरी आणा `डेल`चा लॅपटॉप!
तुम्हाला लॅपटॉप घ्यायचाय परंतु, केवळ लॅपटॉपच्या किंमती पाहून तुम्ही तुमची खरेदी पुढे ढकलत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे...
मुंबई : तुम्हाला लॅपटॉप घ्यायचाय परंतु, केवळ लॅपटॉपच्या किंमती पाहून तुम्ही तुमची खरेदी पुढे ढकलत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे...
कम्प्युटर - लॅपटॉप विक्रेती अमेरिकन कंपनी डेल तुमच्यासाठी एक धम्माल ऑफर घेऊन आलीय. यामुळे, तुम्हाला केवळ एका रुपयाला 'डेल'चा लॅपटॉप मिळू शकणार आहे.
'बॅक टू स्कूल' या ऑफरची घोषणा सोमवारी डेलनं केलीय. २२ मार्च ते ३१ मेपर्यंत ही ऑफर सुरू राहील. डेलच्या सर्व अथॉराईज्ड आउटलेट तसंच ऑनलाईन वेबसाईटवरही ही ऑफर उपलब्ध आहे.
विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना यासाठी एका आठवड्याच्या आत या ऑफर अंतर्गत रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यानंतर केवळ एक रुपया देऊन उरलेले पैसे व्याजमुक्त हफ्त्यांत भरावे लागतील. या ऑफरचा फायदा केवळ विद्यार्थ्यांना मिळू शकेल.