धीरुभाई अंबानींच्या जन्मदिनी जुन्या-नवीन ग्राहकांना जिओ 4जीची आणखी एक भेट
रिलायन्स जिओने 4जी मोबाईल सेवेसाठी फ्री ऑफर देऊन टेलिकॉम क्षेत्रात धमाका केला. आता मार्केटमध्ये आणखी एक चर्चा आहे. रिलायन्स जिओ आपली 4जीची फ्री सेवा 2017 पर्यंत वाढविण्याची शक्यता आहे.
मुंबई : रिलायन्स जिओने 4जी मोबाईल सेवेसाठी फ्री ऑफर देऊन टेलिकॉम क्षेत्रात धमाका केला. आता मार्केटमध्ये आणखी एक चर्चा आहे. रिलायन्स जिओ आपली 4जीची फ्री सेवा 2017 पर्यंत वाढविण्याची शक्यता आहे.
ही घोषणा 28 डिसेंबरपर्यंत होण्याची शक्यता आहे. रिलायन्स उद्योगाचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांच्या जन्मदिनी ही घोषणा होऊ शकते, असे मार्केट अभ्यासक सांगतात.
रिलायन्स जिओ आपले ग्राहक वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोफत 4जी या योजनेत वाढ करु शकते. डिसेंबर 2016पर्यंत ही मोफत सेवा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार ही सेवा मार्च 2017 पर्यंत वाढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिलायन्स जिओला आपले ग्राहक वाढविण्यासाठी याचा लाभ होईल, असे सांगण्यात येत आहे.