मुंबई : तुम्ही अनेकदा सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेला असाल मात्र कधी विचार केलाय का थिएटरमध्ये ABCDEFGHच्या रांगा असतात मात्र I आणि Oच्या रांगा नसतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरतरं इंग्रजी वर्णमालेतील I आणि O ही दोन अक्षरे १ आणि ० सारखी दिसतात. यामुळे लोकांचा गैरसमज होऊ नये यासाठी थिएरटमध्ये कधीही I आणि Oच्या रांगा नसतात. 


याव्यतिरिक्त अनेकदा थिएटरमधील काही जागा नेहमी रिकाम्या दिसतात. खरतंर या व्हीआयपी सीट्स असतात. ऑनलाईन सीट बुक करतानाही या सीट्स बुक दिसतात. तसेच तिकीट काऊंटरवरही या सीटचे तिकीट दिले जात नाही.