सॅमसंग स्मार्टफोनवर घसघसीत सूट
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाईल उत्पादक कंपनी सॅमसंगने ग्राहकांसाठी घसघसीत सूट दिली आहे. स्मार्टफोनवर चक्क 10 हजार रूपयांपर्यंतची सूट देऊ केली आहे.
मुंबई : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाईल उत्पादक कंपनी सॅमसंगने ग्राहकांसाठी घसघसीत सूट दिली आहे. स्मार्टफोनवर चक्क 10 हजार रूपयांपर्यंतची सूट देऊ केली आहे.
दरम्यान, ही सूट एक्सचेंज ऑफरवर आहे. तर, 'सॅमसंग डेज' या खास ऑफरनुसार फ्लिपकार्टवर सॅमसंग जे 5 फोनवर 1300 रूपये इतकी सुट सूरू आहे. सॅमसंग जे 5 ची मूळ किंमत 13 हजार 900 असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या योजनेचा लाभ घेण्यासाठी फ्लिपकार्टवर जुन्या फोनची माहिती नोंदविणे ग्राहकाला आवश्यक आहे. फोनची माहिती नोंदवताच फोनची कमाल किंमत ग्राहकाला दाखविण्यात येईल. त्यानंतर ग्राहकाने त्याबाबत निर्णय घ्यायचा आहे.
सॅमसंगच्या जे 5 या स्मार्टफोनला ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळतो याबाबत उत्सुकता आहे. मात्र, या स्मार्टफोनला ग्राहक नक्कीच चांगला प्रतिसाद देतील, असा दावा कंपनीने केला आहे.