मुंबई : सध्या काळ बदलत चाललाय. आता महिला केवळ चूल आणि मूलपर्यंत मर्यादित राहिलेल्या नाहीत. सुरुवातीच्या काळात पुरुष बाहेरुन पैसा कमवून आणत असे आणि महिला घरातलं सगळ सांभाळत. मात्र आता पुरुषांच्या बरोबरीने महिला काम करतात. घर सांभाळण्यासोबतच घराचा आर्थिक भारही उचलतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतका बदल झाला असूनही लग्नानंतर महिलेला पहिले प्राधान्य तिच्या सासरच्या घराला दयावे लागते त्यानंतर येतो तिचा जॉब, तिचे करिअर. समस्त पुरुषवर्गाला एकच विचारणा आहे की लग्नानंतर महिलांना त्यांचे स्वत:चे करिअर नसते. पुरुषांच्या करिअरला जितके महत्त्व आहे तितके महत्त्व पत्नीच्या करिअरला नसते का?


यावरच प्रकाश टाकणारा हा व्हिडीओ आहे. पतीची कामामुळे बदली झाल्यामुळे पत्नी कंपनीतून राजीखुशीने ट्रान्सफर करुन घेते. मात्र त्याचवेळी जेव्हा पत्नीची बदली होते त्यावेळी पती ट्रान्सफर घेण्यास तयार नसतो. पत्नीच्या करिअरचे काय आहे इतके महत्त्व असे त्याला वाटते. 


पाहा हा व्हिडीओ