मुंबई : एटीएम बूथमध्ये फाडलेल्या स्लिप्सनी भरलेला डस्टबिन तुम्ही पाहिलाच असेल. तुम्ही एटीएममधून कॅश काढता आणि स्लिप फाडून डस्टबिनमध्ये टाकून देता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र तुम्हाला माहीत आहे का या स्लिप किती फायदेशीर ठरु शकतात. पासबुक अपडेट करणे आता जुनी पद्धत झालीये. आधी लोक रेग्युलरली पासबुक अपडेट करायचे. 


मात्र एटीएममधून पैसे काढण्याची सोय झाल्यामुळे बँकेत पैसे काढण्यासाठी जाण्याचे प्रमाणही कमी झालेय. त्याचबरोबर पासबुक अपडेटिंगचे प्रमाणही कमी झालेय. त्यामुळे अकाऊंटमध्ये किती पैसे शिल्लक आहेत हे पाहण्यासाठी या स्लिपचा उपयोग होतो. तसेच कितीवेळा, किती वाजता, कोणत्या दिवशी किती पैसे काढले याची माहिती एका स्लिपमधून मिळते. 


अनेकदा पैसे काढलेले आपल्याला आठवत नाहीत आणि अकाऊंटमधील पैसे कमी दिसल्यास भिती वाटते कोणी काढले तर नाही ना. यावेळी या स्लिप फायदेशीर ठरतात. तसेच जगात हल्ली सायबर क्राईमद्वारे एटीएममधून पैसे चोरले जातात. यावेळी या स्लिप फायदेशीर ठरतात. अकाऊंटमधून पैसे काढल्याची माहिती आपल्याकडे राहते.