मुंबई : रिलायंस जिओ 4G सिम ५ सप्टेंबरपासून संपूर्ण देशामध्ये सेवा सुरु करणार आहे. जिओसाठी लोकं मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. पण सिमकार्ड अजून रिलायंस स्टोरमध्ये उपलब्ध झालेलं नाही. पण तुम्हाला जर हे सिमकार्ड हवं असेल तर तुम्ही सोप्या पद्धतीने ते मिळवू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायंसने फ्री वेल्कम ऑफरची सुरुवात केली आहे. ही ऑफर प्रत्येकासाठी असणार आहे. 


कसं मिळवाल सिमकार्ड ?


जिओ सिमकार्ड हवं असल्यास सगळ्यात आधी 4जी स्मार्टफोन यूजरसाठी 'माई जियो' अॅपची गरज आहे. आईओएस या एंड्रॉयड यूजर्स गुगल स्टोर किंवा अॅप्पल स्टोरवर जावून ते इन्स्टॉल करु शकता.


जर तुम्हाला असं शक्य नसेल तर मग तुम्ही आणखी एक सोपी पद्धत वापरु शकता. फक्त 1800-200-200-2 नंबरवर एक कॉल करु शकता. हा एक टोल फ्री क्रमांक आहे.