नवी दिल्ली : फेसबुकवरचा एक व्हायरस व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चर्चेत आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हालाही असा एखादा व्हिडिओ फेसबुकवर दिसला असेल तर वेळीच सावध व्हा... आणि हा व्हिडिओ उघडून पाहण्याचा प्रयत्न करू नका. हॅकर्सनं तयार केलेला हा एक व्हायरसचा प्रकार आहे. 


एखाद्या फिचर व्हिडिओप्रमाणे तुमच्या फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडिओ तुम्हाला दिसेल. जर या व्हिडिओवर क्लिक केलंत तर तुमचे सगळे फेसबुक कॉन्टॅक्टस् आपोआप स्कॅन होतील आणि हीच व्हिडिओची लिंक तुमच्या नकळत तुमच्या सर्व मित्रांपर्यंत पोहचेल... आणि एखाद्या साखळी प्रमाणे हा व्हिडिओ व्हायरस पुढे पुढे पसरत राहील.


कसा ओळखाल हा व्हिडिओ व्हायरस


- या व्हिडिओ फाईलचा फॉरमॅट काहीसा असा असेल : RIGVTL1F.LATESTNEWSTODAYS. COM


- या व्हिडिओत तुम्हाला तुमचा फोटो, प्रोफाईल फोटो दिसू शकतो.


- या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमच्या मित्रांना आपोआप टॅग केलं जाईल.


या व्हिडिओपासून कसं दूर राहाल


- असा व्हिडिओ दिसल्यास तत्काळ तुमच्या मित्रांना अलर्ट करा...


- तुमच्या अॅक्टिव्हिटि लॉगमध्ये जा आणि अशा पद्धतीच्या सगळ्या पोस्ट डिलीट करा


- तुमच्या फेसबुक प्रोफाईलमधून नको असलेले अॅप्स काढून टाका


- तुमच्या सर्च इंजिनच्या हिस्ट्रीमधून ब्राऊजर, कॅचे आणि कुकीज क्लिअर करा...


- तुमच्या डेस्कटॉपवरच्या अॅन्टीव्हायरसनं तुमचा सिस्टम स्कॅन करून घ्या