प्रेयसीला या ४ गोष्टी कधीच बोलू नका
गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असणं ही आता काही असामान्य गोष्ट झाली आहे. आज अनेक तरुण-तरुणी रिलेशनमध्ये आहेत. पण अनेकांना हे रिलेशन टिकवणं कठिण होऊ जातं कारण असतं तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला विचारलेला एक असा प्रश्न ज्यामुळे तिला हर्ट होऊ शकतं. त्यामुळे असे काही प्रश्न आहेत ज्या प्रेयसीला विचारणं टाळलं पाहिजे.
मुंबई : गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असणं ही आता काही असामान्य गोष्ट झाली आहे. आज अनेक तरुण-तरुणी रिलेशनमध्ये आहेत. पण अनेकांना हे रिलेशन टिकवणं कठिण होऊ जातं कारण असतं तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला विचारलेला एक असा प्रश्न ज्यामुळे तिला हर्ट होऊ शकतं. त्यामुळे असे काही प्रश्न आहेत ज्या प्रेयसीला विचारणं टाळलं पाहिजे.
१. खरेदी विषयी काही बोलू नका :
तरुणींना खरेदी करायला आवडतं हे काही वेगळी सांगयची गोष्ट नाही. जर तुम्ही त्यांच्यासोबत शॉपिंगला जाणार असाल तर ती जर एखादी वस्तू घेत असेल तर तिला तुम्ही घेऊ नको असं म्हणू नका. त्यामुळे तुम्हालाच बोलणं ऐकावं लागू शकतं.
२. आरोग्याविषयी बोलू नका :
मुली छोट्या-छोट्या गोष्टी देखील सांगतात त्यामुळे जर त्यांना काही आरोग्याविषयी तक्रार असेल आणि ती जर तुम्हाला सांगत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. तुम्हाला देखील त्यांची काळजी आहे असं तुमच्या बोलण्यातून दिसू द्या.
३. मेकअपसाठी किती वेळ लागतो.
मुलींना सुंदर दिसायला आवडतं यात काही शंकाच नाही म्हणून ते तयार होण्यासाठी खूप वेळ घेतात. तुम्ही जर कोठे बाहेर जाणार असाल आणि प्रेयसीला वेळ लागणार असेल तर तुम्ही ती गोष्ट बोलून दाखवू नका. तुमचा प्लॅन फिसकटू शकतो.
४. मुलींच्या कपड्याविषयी वाईट बोलू नका
मुलींना कोणते कपडे आवडतात हा त्यांचा वैयक्तीक प्रश्न असतो. त्यांना तुम्ही जर सांगितलं की तू हे कपडे घालू नकोस तर ती तुमचं ऐकलंच असं नाही. उलट तुमची बोलण्याची पद्धत बदला. तिला असं म्हणू शकता की यापेक्षा तू त्या कपड्यांवर सुंदर दिसतेस. पुढच्या वेळेस प्रेयसी तसेच कपडे घालून येईल.