ही तीन अॅप बनवतात स्मार्टफोनला सूपरफास्ट
स्मार्टफोनचं हँग होणं आणि स्लो होणं या समस्येला बहुतेक सगळ्याच जणांना सामोरं जावं लागतं.
मुंबई: स्मार्टफोनचं हँग होणं आणि स्लो होणं या समस्येला बहुतेक सगळ्याच जणांना सामोरं जावं लागतं. फोनमध्ये असलेल्या भरमसाट अॅपमुळे तुमचा फोन हँग आणि स्लो होतो. यावर उपाय म्हणून अनेक जण काही अॅप डिलीट करतात, पण गुगल प्लेवर अशी काही अॅप आहेत जी इन्स्टॉल केल्यावर तुमच्या मोबाईलचा स्पीड वाढतो.
DU Speed Booster
डीयू स्पीड बूस्टर हे गुगल प्लेवरून सर्वाधिक डाऊनलोड होणारं अॅप आहे. हे ऍप मोबाईलच्या बॅकग्राऊंड प्रोसेसला हायबरनेटवर ठेवतं, ज्यामुळे मोबाईल स्लो होत नाही. हे अॅप इन्स्टॉल केल्यावर तुम्हाला फोनमधील पुश अपडेट, विजेट्स, मेसेज आणि टास्क स्टॉप करता येतील. बॅटरी वाचवण्यासाठीही हे अॅप उपयोगी आहे.
Greenify
डीयू स्पीड बूस्टरप्रमाणेच हे अॅपही मोबाईलच्या बॅकग्राऊंड प्रोसेसला हायबरनेटवर ठेवतं. बॅटरी वाचवण्यासाठी आणि मोबाईलचा परफॉर्मन्स बूस्ट करण्यासाठी हे अॅप वापरलं जातं.
Android Assitant
हे ऍप तुम्हाला जुनं वाटेल, पण फोनसाठी हे अॅप एक्सपर्टप्रमाणे काम करतं. हे अॅप डाऊनलोड केल्यावर मोबाईलच्या फाईल्स, सीपीयू, रॅम, एसडी कार्ड आणि बॅटरी मॉनेटर कंट्रोल होतं.
हे अॅप मोबाईल प्रोसेसरला मॅनेज करून फोनमधलं कॅचे क्लिअर करतं, यामुळे मोबाईलचा स्पीड वाढतो. या अॅपमध्ये वन क्लिक बूस्ट फिचरही आहे. यावर क्लिक केल्यामुळे मोबाईलचा स्पीड वाढतो.