मुंबई : ज्याने वयाच्या ११व्या वर्षीच कशाचीही पर्वा न करता नदीच्या डोहात उडी मारुन बुडणाऱ्या तरुणांचा जीव वाचवला...विजेच्या खांबावर चढून वीज दुरुस्त केली. बेधुंद झालेल्या बिबळ्याला नुसत्या प्रेमाने नमवले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम करत करत. खुप कष्टांने, हालाकीच्या परिस्थितीत महारोग्यांना आसरा देत हा बालक रोज मोठा होत गेला. असंख्य..दिन..दुबळ्या,आजारी गरीब मागासलेल्यांच्या आयुष्यात "प्रकाश" बनून उजळू लागला. हा बालक दुसरा तिसरा कुणी नसून आपले डॉ. प्रकाश बाबा आमटे आहेत.


काय वेगळे आहे त्यांच्यामध्ये 


काहीच चमत्कार किंवा दैवी शक्ती नसून वेगळेपण आहे ते अचाट जिद्द आणि फक्त आणि फक्त निस्वार्थी सेवा भावना. मित्रांनो आपल्या सगळयांमध्येच हा प्रकाश असतो आपल्याला फक्तं त्याची जाणीव व्हायला पाहिजे. जर का ती झाली तर बघा आपले सगळ्यांचे आयुष्य कसे सम्रुध्दिने उजळून निघते आणि तेच खरे जगणे तेच खरे समाधान. सुंदर आयुष्याचे गुपीत.


सध्या अशी पोस्ट सोशल नेटवर्किंग साईटवर व्हायरल होतेय.