नवी दिल्ली : दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओबाबत एक धक्कादायक ऑडिट रिपोर्ट समोर आली आहे. यात म्हटले की कंपनीने ३ वर्षाच्या कालावधीत आपले एकूण उत्पन्नात ६३ कोटी रुपये कमी दाखविले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कालावधीत कंपनीने परकीय विनिमय दरात बदलाचा लाभ आपल्या उत्पन्नात दाखविला नाही. या आधारावर ऑडिट महानिदेशालय (डाक आणि दूरसंचार) ने या रिपोर्टमध्ये म्हटले की कंपनीने या कालवधी दरम्यान लायसन्स शुल्क कमी भरण्यात आले होते. 


पाच पानांचा हा रिपोर्ट २२ फेब्रुवारी २०१७ रोजी समोर आला. यात म्हटले की कंपनीने २०१२-१३ मध्ये १.२९ कोटी, २०१३-१४ मध्ये ४१.६७ कोटी आणि २०१४-१५मध्ये २०.८१ कोटी रुपये परकीय चलनात लाभ झाला होता. तसेच लायसन्स शुल्क मिळवून एकूण ६३.७७ कोटी रुपये कमी दाखविण्यात आले होते.