फेसबूकमुळे स्लो होतो तुमचा स्मार्टफोन, बॅटरीपण लवकर संपते
जगातली सगळ्यात मोठी आणि प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साईट, अर्थातच फेसबूक. पण फेसबूकच्या ऍपमुळे मोबाईल स्लो होतो, एवढच नाही तर फेसबूक ऍपमुळे फोनची बॅटरीपण लवकर संपते.
मुंबई: जगातली सगळ्यात मोठी आणि प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साईट, अर्थातच फेसबूक. पण फेसबूकच्या ऍपमुळे मोबाईल स्लो होतो, एवढच नाही तर फेसबूक ऍपमुळे फोनची बॅटरीपण लवकर संपते.
लंडनमध्ये घेण्यात आलेल्या टेस्टनंतर ही गोष्ट समोर आली आहे. फेसबूक ऍपच्या वापरामुळे तुमचा फोन 15 टक्क्यांपर्यंत स्लो होतो, असा निष्कर्ष या टेस्टनंतर काढण्यात आला आहे.
या टेस्टमध्ये स्मार्टफोनचे 15 पॉप्युलर ऍपचा समावेश करण्यात आला होता. तेव्हा फेसबूक ऍप नसताना बाकीचे ऍप लवकर लोड झाले. त्यामुळे फेसबूक ऍप वापरण्याऐवजी ब्राऊजरवरच फेसबूक वापरण्याचा सल्लाही काही युजर्सनी दिला आहे.
तर फेसबूकचं मेसेंजर ऍप यापेक्षाही जास्त खराब असल्याचा दावाही युजर्सनी केला आहे.