मुंबई : इंटरनेट सध्या ही प्रत्येकाची अत्यावश्यक गरज बनलीये. आज आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस आहे. अन्न, पाणी, निवारा यासोबतच इंटरनेट ही चौथी मूलभूत गरज झालीये. दिवसाचा कित्येक वेळ आपण इंटरनेटवर घालवत असतो. जगात दररोज तब्बल 182.9 अब्ज ईमेल्सची देवाणघेवाण होते. तुम्हाला माहीत आहे का पहिला ईमेल कधी पाठवण्यात आला होता.


घ्या जाणून


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

46 वर्षांपूर्वी पहिला ईमेल पाठवण्यात आला होता. त्यावेळी ARPANETच्या माध्यमातून 'LO' हा मेसेज ईमेलद्वारे पाठवण्यात आला होता. ईमेलमध्ये लॉगइनच्या जागी LO असे लिहिण्यात आला होता. रात्री 10.30 वाजता पहिला ईमेल पाठवण्यात आला होता. 


रे टॉमिल्सन यांनी 1971 मध्ये पहिला ईमेल पाठवला आणि ईमेलद्वारे संभाषणाला सुरुवात झाली. त्यावेळी इंटरनेटही नव्हते. ईमेल पाठवण्यासाठी ARPANET अर्थात अॅडवान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्कचा वापर करण्यात आला होता. या एजन्सी नेटवर्कचा वापर ही इंटरनेटसाठी नांदी ठरली.