पॅरिस : १०६ अब्ज रुपयांच्या कर थकबाकी प्रकरणी जगातील सर्वात मोठी इंटरनेट कंपनी 'गुगल'च्या मुख्यालयावर छापा टाकण्यात आला आहे. फ्रान्सच्या अर्थ मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगल कार्यालयात १०० पेक्षा अधिक पोलीस आणि अधिकाऱ्यांचा फौजफाटा होता. या कारवाईत गुगल कार्यालयाची झडती घेताना अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 


फ्रान्स पोलीस तसेच अर्थ मंत्रालयाने गुगलच्या प्रतिनिधींना काही लेखी प्रश्न विचारले होते त्याला प्रतिसाद न मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली. फ्रान्समधील दैनिक 'ली पॅरिसियन'ने दिलेल्या बातमीनुसार पहाटे ५ वाजता ही कारवाई करण्यात आली.


फ्रान्स अर्थ मंत्रालयातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार गुगलकडे करापोटी १०६ अब्ज रुपयांची थकबाकी आहे. ब्रिटनमध्ये गुगलने जानेवारीतच करापोटी १८ कोटी ९७ लाख डॉलर चुकते करण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, या कारवाईबाबत गुगलने मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.