कानपूर : तुमचा विश्वास जर बुलंद असेल तर मग प्रत्येक गोष्ट सहज होऊन जाते. तुम्हाला कोणतीही गोष्ट अशक्य नसते. हीच गोष्ट खरी करुन दाखवली आहे कानपूरमधल्या एका अतिशय गरीब घरातील तरुणीने. आर्थिकदृष्ट्या मागसलेली असलेल्या शिवांगीने मोठं यश मिळवतं अनेकांची प्रेरणास्थान ठरली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कानपूरमधील देहागावात राहणारी शिवांगी सरकारी शाळेत शिकत होती. शाळा सुटल्यानंतर ती तिच्या वडिलांसोबत पेपर आणि मॅगजिन विकायची. हे सगळं करुन ती अभ्यासासाठी वेळ काढायची. शिवांगीने अशाच प्रकारे बारावीचं शिक्षण पूर्ण केलं. यानंतर तिला एका दिवशी आनंद कुमार यांच्या 'सुपर 30' याबाबत कळालं आणि यानंतर तिचं आयुष्यच बदललं. शिवांगी तिच्या वडिलांसोबत आनंद कुमार यांना भेटायला गेली. शिवांगीचं निवड ‘सुपर 30’मध्ये झाली. शिवांगीने IIT पास केलं आणि आता ती एका प्रतिष्ठीत कंपनीत काम करते आहे.


शिवांगीची कथा तिचे गुरु आणि सुपर 30 चे संस्थापक आनंद कुमार यांनी स्वत: जगाला समोर आणली. आनंद कुमार यांनी फेसबूकवर शिवांगीच्या यशाची यशोगाथा शेअर केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आता जशी शिवांगीला नोकरी लागल्याची माहिती आम्हाला मिळाली आम्हाला खूप आनंद झाला.