मुंबई : तुम्ही रोजंच उशीरा येतायत आणि तुमचा बॉस आणि टीममधील सदस्य तुम्हाला आजही उशीर असं बोलतायत. तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमच्या नेहमी उशीरा पोहचण्याच्या सवयीवर एक उत्तर सायन्सने शोधून काढलं आहे, हे उत्तरंही तुमच्या बाजूने आहे. सायन्सने म्हटलंय, उशीरा येणारे लोक हे आशावादी असतात.


सायन्टीफिक रिसर्चनुसार उशीरा येणारी माणसं आशावादी असतात, ते बहुआयामी आणि नेहमी आशादायक असतात.


सन डिएगो स्टेट युनिवर्सिटीने केलेल्या एक वेगळ्या रिसर्चनुसार, बी टाईपची माणसं, थोडक्यात प्रत्येक गोष्टीचं ते एक मोठं चित्र पाहत असतात. त्यांना लहानसहान गोष्टींवर कुढत बसायला आवडत नाही.


प्रत्येक चांगल्या किंवा वाईट गोष्टीत त्यांचा उशीर ठरलेला असतो, पण तो अनेकवेळा तो महत्वाचाही ठरतो, असं नेव्हर बी लेट अगेन पुस्तकाचे लेखक डायना डिलोन्झर यांनी म्हटलं आहे.