मुंबई : गुगलनं त्यांचं नवं ऍप यूट्यूब गो भारतामध्ये लॉन्च केलं आहे. या ऍपमुळे ग्राहकांना कमी इंटरनेट स्पीड असतानाही व्हिडिओ पाहता येणार आहे. मागच्याच वर्षी सप्टेंबरमध्ये गुगलनं यूट्यूब गो लॉन्च केलं होतं, पण आता हे ऍप भारतातही लॉन्च करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूट्यूब गो हे ऍप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. भारतीयांकडून मिळालेल्या सूचनांनुसार भारतासाठी या ऍपमध्ये बदल करण्यात आल्याचं कंपनीनं सांगितलं आहे. याचबरोबर या ऍपमध्ये व्हिडिओ शेअर करण्याचा ऑप्शनही देण्यात आला आहे.