नवी दिल्ली : देशातल्या लघुउद्योगांना चालना देण्यासाठी गुगलनं आज दोन अॅप्स बाजारात आणली. दिल्लीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी डिजिटल अनलॉक आणि माय बिझनेस वेबसाईट ही अॅप्स लाँच केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिजिटल अनलॉकच्या माध्यमातून लघुउद्योजकांसाठी प्रशिक्षण अभ्यासक्रम चालवला जाणार आहे. या अभ्यासक्रमासाठी फिक्की आणि इंडियन स्कूल ऑफ बिझनेसचं सहकार्य घेण्यात आलंय. माय बिझनेस वेबसाईट या अॅपचा वापर करून लघू उद्योजकांना आपली स्वतःची वेबसाईट काढता येणार आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजिटल इंडिया आणि स्टार्ट अप इंडिया या मोहिमांना यामुळे चालना मिळणार आहे.