मुंबई : गूगलने whatsaap ला टक्कर देण्यासाठी स्वतःचे इंन्स्टट मेसेजिंग अॅप  Allo लॉन्च केले आहे. अॅप आजपासून अॅन्ड्रॉइड आणि iOS वापरणाऱ्यांसाठी उपलब्ध झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Allo हे अॅप प्ले-स्टोरवर आणि अॅपलच्या अॅप स्टोरवरून हे डाऊनलोड करता येऊ शकते. गूगल आपल्या सर्च इंजिनचा वापर करून इतर मेसेंजरपेक्षा याला स्मार्ट बनवण्यासाठी कामाला लागले आहे.
 या Allo अॅपवरुन त्वरीत रिप्लाय करणे शक्य आहे. रिप्लाय करताना तुम्हाला अनेक सजेशन मिळतील त्याला टॅप करून उत्तर देता येईल. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे समोरच्याने तुम्हाला काय पाठवलंय हे समजेल.  


गूगल असिस्टंटवर क्लिक केल्यास एक कन्वर्सेशन ओपन होईल. याद्वारे थेट गूगल चॅट बॉटसोबत चर्चा करू शकता. येथे तुम्हाला अनेक कॅटेगरी मिळतील. ज्यामध्ये वेदर, गेम, स्पोर्ट्स, फन, ट्रांन्स्लेशनसारखे अनेक पर्याय आहेत. 


फोटोज, इमोजी आणि स्टिकर्स असून तुम्हाला प्रायव्हसी हवी असेल तर Allo मध्ये इन्कॉग्निटो मोड देखील देण्यात आला आहे. दरम्यान, हे अॅप डाऊनलोड करताना एकदम स्लो आहे. त्यामुळे त्वरीत डाऊनलोड होत नसल्याचे दिसून आले.