नवी दिल्ली : तुम्ही नोकरीच्या प्रतिक्षेत असाल तर तुमच्यासाठी ही खुशखबर आहे. सरकारी नोकरीची ही संधी आहे. सेंट्रल सायंटिफिक इंस्टुमेंट्स ऑर्गेनायझेशनमध्ये (CSIO) टेक्निकल असिस्टंट, हॉर्टिकल्चर असिस्टंट आणि ज्युनिअर असिस्टंट पदासाठी भर्ती करण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पदासांठी अर्ज करण्यासाठी उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा. तसेच मागासवर्गीय उमेदवाराला वयात सूट देण्यात आलेय.


वेतन ९,३०० ते ३४,८०० रुपये असून ग्रेड पेनुसार ४,२०० रुपये देण्याची सोय आहे. उमेदवार ऑलनाईन अर्ज करु शकतो. त्यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागेल. उमेदवार आपला अर्ज दि. ८ मार्च २०१६ पर्यंत करु शकतो.


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी www.csio.res.in या संकेतस्थळावर लॉग इन करा.