मुंबई : व्हॉटसअप हे मोबाईल अॅप्लिकेशन सध्या असं अॅप बनलंय ज्याच्याविना सोशल मीडिया सर्कल अपूर्ण मानलं जातं. कधी कधी तुमच्यावर नाराज झालेल्या एखाद्या मित्रानं किंवा मैत्रिणीनं तुम्हाला व्हॉटसअपवर ब्लॉक केलं... तर तुम्हाला नाराज होण्याची आवश्यकता नाही. 


मित्रानं ब्लॉक केलंय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही स्वत:ला अनब्लॉक करून पुन्हा आपल्या मैत्र-मैत्रिणीशी संवाद साधू शकता. याअगोदर नक्की तुमच्या मित्रानं तुम्हाला ब्लॉक केलंय का याची खात्री करून घ्या. तुमच्या मित्र-मैत्रिणीचा प्रोफाईल फोटो, लास्ट सीन किंवा व्हॉटसअप स्टेटस दिसत नसेल तर समजून घ्या की त्यानं तुम्हाला ब्लॉक केलंय.


किंवा तुम्ही तुमच्या मित्राला एखादा मॅसेज पाठवला आणि त्यावर केवळ एक टिक दिसत असेल तर त्याचा अर्थ आहे तुमचा मॅसेज सेंड झालाय परंतु, डिलिव्हर झालेला नाही... त्यामुळे त्यानं तुम्हाला ब्लॉक केलेलं असू शकतं. 


अनब्लॉकच्या प्रक्रियेत महत्त्वाचं 


स्वत:ला अनब्लॉक करण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला व्हॉटसअपचा बॅकअप मिळणार नाही. जर तुम्ही बॅकअप रिस्टोअर केला तर अनब्लॉक होऊ शकणार नाही.


कसं कराल स्वत:ला अनब्लॉक


- व्हॉटसअप ओपन करा


- आता सेटिंगमध्ये जाऊन अकाऊंटवर क्लिक करा आणि डिलीट माय अकाऊंटवर क्लिक करा


- आता आपला फोन नंबर एन्टर करा आणि आपला अकाऊंट डिलीट करा


- त्यानंतर व्हॉटसअप मॅसेंजर अनइन्स्टॉल करा


- व्हॉटसअप अॅप संपूर्णत: अनइन्स्टॉल झाल्यानंतर आपला फोन रिस्टार्ट करा   


- आता प्ले स्टोअरवर जाऊन पुन्हा एकदा व्हॉटसअप इन्स्टॉल करा


- व्हॉटसअप पुन्हा सुरू करण्यासाठी पुन्हा सगळी माहिती भरा आणि आपला फोन नंबरही एन्टर करा


- झालं... तुम्ही स्वत:ला आपल्या फ्रेंडसच्या व्हॉटसअप अकाऊंटवरून अनब्लॉक केलंय.