मुंबई : या आठवड्याच लाँच झालेल्या ह्युवेई होनोर ८ या स्मार्टने अवघ्या ४ दिवसांतच रेकॉर्ड बनवलाय. कंपनीला या स्मार्टफोनसाठी पहिल्या सेलसाठी अवघ्या चार दिवसांत ५०लाखाहून अधिक रजिस्ट्रेशन मिळालीत. ह्युवेईने टीजर फोटोतून ही माहिती दिलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१८ जुलैपर्यंत या स्मार्टफोनची प्री-ऑर्डर केली जाऊ शकते. १९ जुलैला या स्मार्टफोनची विक्री सुरु होणार आहे. सध्या हा फोन केवळ चीनी मार्केटमध्ये उपलब्ध आहे. 


स्मार्टफोनची किंमत


३२ जीबी स्टोरेज आणि ३ जीबी रॅमच्या फोनची किंमत भारतीय बाजारातसाधारण २० हजार रुपये ठेवण्यात आली आहे.त्याचप्रमाणे ३२ जीबी स्टोरेज आणि ४ जीबी रॅमच्या फोनची किंमत २३ हजार रुपये असेल. ६४ जीबी आणि ४ जीबी रॅमच्या स्मार्टफोनची किंमत २५ हजार असू शकेल.


हे आहेत फीचर्स


या फोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात १२ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आलाय. तसेत ५.२ इंचाची फुल एचडी स्क्रीन आहे. यात १.८ गिगाहर्टझ किरीन ९५० प्रोसेसर आहे.