इंटरनेटचा खर्च वाचवण्यासाठीचे 4 फंडे
स्मार्टफोनवर इंटरनेट डेटा लवकर संपतो, ही तर जवळपास प्रत्येकाचीच तक्रार असते.
मुंबई: स्मार्टफोनवर इंटरनेट डेटा लवकर संपतो, ही तर जवळपास प्रत्येकाचीच तक्रार असते. इंटरनेटवर होणाऱ्या खर्चामुळे अनेकांचं बजेटही कोलमडतं. पण मोबाईलच्या सेटिंगमध्ये बदल केले तर तुमचे खर्च होणारे पैसे 70 टक्क्यांपर्यंत वाचू शकतात.
इंटरनेटचा डेटा वाचवण्याचे हे आहेत 4 फंडे
1 गुगल क्रोमचं सेटिंग करा चेंज
ऍंड्रॉइडवर गुगल क्रोममध्ये 70 टक्क्यांपर्यंत इंटरनेट डेटा वाचवता येऊ शकतो. इंटरनेट वाचवण्यासाठी क्रोमच्या सेटिंगमध्ये जा. सेटिंगमध्ये खाली डेटा सेव्हर हा ऑप्शन आहे. हा ऑप्शन ऑन केल्यानंतर तुमचा इंटरनेट डेटा मोठ्या प्रमाणावर वाचू शकतो. हा ऑप्शन ऑन केल्यामुळे धोकादायक अशी थर्ड पार्टी ऍप डाऊनलोड व्हायचा धोकाही थांबवता येतो. क्रोममध्ये ग्राफच्या मदतीनं तुम्ही किती डेटा वाचवलात हे ही पाहू शकता.
2 यूसी ब्राऊसरवरही वाचवता येतात पैसे
यूसी ब्राऊसरच्या मदतीनंही तुम्हाला 60 टक्क्यांपर्यंत इंटरनेट डेटा वाचवता येईल. या ब्राऊजरमध्ये 'टेक्स्ट ओन्ली मोड' हा ऑप्शन आहे. हा ऑप्शन ऑन केल्यामुळे तुम्हाला वेब साईटवर फक्त टेक्स्टच दिसेल. ब्राऊजिंग करताना फोटो पूर्णपणे हटवला जाऊ शकतो. तुमच्याकडे वाय-फाय सुविधा असेल तरच फोटो लोड होतील. मोठं रिझोल्युशन असलेला फोटोही कंप्रेस झाल्यामुळे तुमचे पैसे वाचू शकतात.
यूसी ब्राऊसरमध्ये 'टेक्स्ट ओन्ली मोड' ऑप्शन ऑन करण्यासाठी मेन्यू मध्ये जा, मेन्यूमध्ये डाव्या बाजूला स्वॅप केल्यानंतर टेक्स्ट ओन्ली मोड चा ऑप्शन तुम्हाला दिसेल, तो ऑन केल्यावर तुमच्या इंटरनेट डेटामध्ये बचत होईल.
3 ओपेरा मिनी मध्ये कशी कराल बचत ?
ओपेरा मिनी वेबपेज लोड व्हायच्या आधीच त्याला कंप्रेस करून छोटं करतं. इंटरनेट डेटा वाचवण्यासाठी ओपेरा मिनीच्या सेटिंगमध्ये जा. तिथे सगळ्यात वरती लोड इमेजचा ऑप्शन असेल, त्यावर क्लिक केल्यानंतर इमेज क्वालिटीचा ऑप्शन येईल, यातली इमेज क्वालिटी कमी करा. त्यामुळे इंटरनेट ब्राऊज करताना मोठ्या रिजोल्युशनचा फोटो लोड व्हायच्या आधीच छोटा होतो.
4 कॉम्प्यूटरवरही वाचवा इंटरनेट डेटा
कॉम्प्यूटरवर वेबसाईट सुरु करताना पॉप अप आणि जाहिराती मध्येच येतात. त्यामुळे इंटरनेट डेटा मोठ्या प्रमाणावर फुकट जातो. तसंच इंटरनेटचा स्पीडही कमी होतो. हे पॉप अप आणि जाहिरातीही गुगल क्रोमवर बंद करता येतात.
त्यासाठी क्रोमच्या सेटिंगमध्ये जा, तिथे अॅडव्हान्स सेटिंगचा ऑप्शन येईल, या अॅडव्हान्स सेटिंगमध्ये प्रायव्हसीचा ऑप्शन असेल, तिथे कंटेट सेटिंगवर जाऊन प्लगिन आणि पॉप अप बंद करता येतो. त्यामुळे कोणत्याही वेबसाईटवर तुम्हाला पॉप अप दिसणार नाही. तसंच वेबपेज लोड होताना इंटरनेटचीही बचत होईल.