मुंबई : मुलींचं मन जिंकणं तसं सोप नसतं, आणि तसं पाहिलं तर कठीणही नाही, मग नेमकं असं काय असतं, की मुलींना तुम्ही नकोसे वाटतात.


प्रगल्भता महत्वाची आहे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणतंही नातं टिकवण्यासाठी तुम्ही किती समजदार आहात ते महत्वाचं आहे. तुमचा नादानपणा एखाद्याला नाराज करू शकतो. दुसऱ्यांशी वाईट वागताना विचार करा, इगो आणि शोबाजी दाखवली तर तुम्ही कुणालाही आवडणार नाहीत.


दुसऱ्यांचा आदर करा


मुलींना अशी मुलं जास्त आवडतात, जे दुसऱ्याचा आदर आणि मोठ्यांचा सन्मान करतात. दुसऱ्यांना त्रास देणारे, इतरांचा अपमान करणारे मुलं त्यांना आवडत नाहीत. 


धैर्यवान मुलाची गरज


मुलींचं मन जिंकण्यासाठी त्यांना लगेच जाऊन प्रेम व्यक्त करू नका, तर त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती समजून घ्या, नाही तर मोठी अडचण होऊ शकते.


मैत्रीने सुरूवात करा


मुलीला प्रपोज करण्याआधी तिच्याशी मैत्री करा, मैत्रीचं रूपांतर प्रेमात करण्यासाठी आधी तिला समजून घ्या, तेव्हाच तुम्हाला मनातली गोष्ट सहज व्यक्त करता येणार आहे.


तिचं ऐकून घेण्याची भूमिका ठेवा


मुलींना बोलायला खूप आवडतं, अशात त्यांना वाटतं की त्यांचं ऐकून घेणार कुणीतरी असावं. म्हणून मुलींना इम्प्रेस करायचं असेल, तर मुलींना जास्त बोलू द्या आणि तुम्ही कमी बोला.


सेन्स ऑफ ह्यूमर महत्वाचा


 तुमचं सकारात्मक विचार करण्याशिवाय तुमचा सेन्स ऑफ ह्यूमर महत्वाचा आहे, मुलींना सेन्स ऑफ ह्यूमर खूप आवडतो. गंभीर वातावरणातला तणाव कमी करण्याची तुमची कला मुलींना आपलंस करू शकते.


संकोच नको..


मुलींना नर्व्हस करू नका, तुम्ही बोलायला घाबरू नका, संकोच करणारा स्वभाव नकोच, नाहीतर मुली तुमच्यापासून दूर राहतील.


विश्वासार्हता वाढवा


मुली नेहमी हसमुख आणि उत्साही असणाऱ्या मुलांना पसंत करतात, शिवाय त्यांचं विश्वासू असणंही महत्वाचं असतं, त्यांचं मन जिंका मात्र मर्यादा ओलांडू नका.



तिची आवड जोपासा


सध्या मुला-मुलींची आवड निवड जरा वेगळी असते, ताळमेळ बसताना दिसत नाही. हे नक्की आहे की तुमच्या रिलेशनमध्ये सत्यता हवी, विश्वास हवा. तुमच्या मनात कोणतीही वाईट गोष्ट नको. सुरूवातीलाच एखाद्या गोष्टीला नाही म्हणा, जर तुम्हाला ती पटत नसेल तर ती काही दिवसांनी पटवून द्या. मात्र तिच्याही आव़डी निवडीचा विचार करा, मान राखा. 


स्वच्छतेला महत्व द्या


मुलींचं पर्सनल हायजीनवर नेहमीच लक्ष असतं, स्वच्छ कपडे, नियमित शेविंग, तसेच घामाचा दुर्गंध येणार नाही याची नेहमी काळजी घ्या.