मुंबई : जॉब मार्केटमध्ये स्वत:ला सादर करणं 'नोकरी डॉट कॉम'सारख्या वेबसाईटमुळे सोप्पं झालं असलं तरी एका बहाद्दरानं मात्र आपले स्कील्स मात्र 'फ्लिपकार्ट' या वस्तू खरेदी-विक्री करणाऱ्या वेबसाईटवर जाहीर विकायला काढलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपन्या लोकांना त्यांच्या स्किल्स आणि टॅलेन्टमुळे कामावर घेतात आणि पगार देतात... त्यामुळेच याला जॉब मार्केट म्हटलं जातं. याच जॉब मार्केटमध्ये आयआयटीचा विद्यार्थी असलेल्या नीरज मित्तलनं आपले स्कील्स विकायला काढलेत. 


आपण एखाद्या 'प्रोडक्ट'ची योग्यता आणि किंमत पाहून त्याची ऑनलाईन शॉपिंग करतो. त्याप्रमाणे नीरजनं आपल्या स्कील्सची बोली फ्लिपकार्टवर लावलीय. आपली किंमत त्यानं २७ लाख ६० हजार २०० रुपये निर्धारीत केलीय. 


आयआयटीच्या विद्यार्थ्यांसाठी ही काही फार मोठी रक्कम नाही. परंतु, काही तरी नवीन करण्याच्या उद्देशानं आपण वेगवेगळे उपाय शोधून काढत असल्याचं नीरजनं म्हटलंय. 


नीरजची जाहिरात