मुंबई : बारावीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं महत्वाची बातमी, बारावीचे पेपर तपासणाऱ्या शिक्षकांनी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना वेठीला धरण्याची भूमिका घेतलीय. येत्या २८ फेब्रुवारीपासून १२ वी बोर्डाची परीक्षा सुरू होतेय. पण परीक्षा सुरु होण्याआधीच निकाल उशीरा लागण्याची शक्यता निर्माण झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण राज्यातल्या ७२ हजार शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीबाबत असहकार आंदोलन पुकारलंय. ३ मार्चपासून एक शिक्षक १२ वीचा केवळ एकच पेपर तपासणार असल्याची भूमिका महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघानं घेतलीय. 


कायम विनाअनुदानित कॉलेजांचा प्रश्न आणि २०१२-१३ पासून रुजू झालेल्या शिक्षकांच्या मान्यतेचा प्रश्न प्रलंबित आहे. गेल्यावर्षी शिक्षणमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्या. पण अद्याप त्याबाबत अंमलबजावणी झाली नसल्यानं शिक्षकांनी आंदोनाची भूमिका घेतलीय.