मुंबई : बेरोजगार तरुणांसाठी नोकरीबाबत आनंदाची बातमी आहे. इंडियन ऑइल कॉपरेशन लिमिटेड कंपनीने लवकरच गरजू उमेदवारांची भर्ती केली जाणार आहे. या कंपनीत एकूण ७० पदे रिक्त आहेत. या जागांवर भर्ती केली जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात अनारक्षित वर्गासाठी ३६ जागा, ओबीसीसाठी १५ जागा आणि अनुसूचित जातींसाठी १६ जागा, उरलेल्या तीन जागा अनुसूचित जमातीसाठी तीन जागा आहेत.  


पात्रता


या पदांसाठी उमेदवारांना १० वी पास असण्याची गरज आहे. तसेच पद्वीधर आणि डिप्लोमा पूर्ण झालेल्या उमेदवारांसाठी पदांनुसार नोकरी मिळेल,


वयोमर्यादा


१८ ते २४ वर्षे वयोमर्यादा असणारे उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. वेगवेगळ्या पदावरील उमेदवारांना वेगवेगळे स्टायपेंड निर्धारित करण्यात आले आहेत. www.iocl.com या वेबसाईटवरुन तुम्ही याबाबत अधिक माहिती मिळवू शकतात.