फेसबूकवर कमाईच्या बाबतीत भारतीय लोकांची बाजी
फेसबूकवर आज अनेक लोकं जोडली गेली आहेत. अनेक जण असा एकही दिवस जात नाही की फेसबूक ओपन करत नाही. फेसबूकवर लाईक करणं, पोस्ट करणं, शेअर करणं या गोष्टी आपण करत असतो.
मुंबई : फेसबूकवर आज अनेक लोकं जोडली गेली आहेत. अनेक जण असा एकही दिवस जात नाही की फेसबूक ओपन करत नाही. फेसबूकवर लाईक करणं, पोस्ट करणं, शेअर करणं या गोष्टी आपण करत असतो.
फेसबूकच्या माध्यमातून कमाई करता आली तर ? तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कसं ? पण तुम्ही फेसबूकवर ही कमाई करु शकता. नुकत्याच आलेल्या एका सर्वेनुसार भारतीय लोकांनी फेसबूकवर कमाई करण्यात बाजी मारली आहे.
फेसबूक कंपनी जे लोक त्यांची कमतरता किंवा चूक शोधून काढतात त्यांनी फेसबूक कडून बक्षीस दिलं जातं. फेसबूक कडून करण्यात आलेल्या एका वक्तव्यात म्हटलं आहे की, भारतीय हॅकर्सने आतापर्यंत ४.८४ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
बग काऊंटी नावाच्या फेसबूक प्रोग्राममध्ये योगदान देण्यात भारतीय लोकांचं प्रमाण अधिक आहे. भारत देश हा १२७ देशांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. तुम्ही शोधून काढलेल्या बगच्या हिशोबाने तुम्हाला बक्षीशाची रक्कम दिली जाते.