नवी दिल्ली : आयफोनचा वापर तुम्ही कशासाठी कराल? फोटो काढण्यासाठी, ईमेल आणि मॅसेजेस पाठवण्यासाठी? किंवा इंटरनेट वापरासाठी... होय ना! पण, चीनमध्ये मात्र मुली याच आयफोनचा वापर एका अशा कामासाठी करतायत जो कुणी कधी विचारही केला नसेल... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनमध्ये मुली स्वत:ला सडपातळ असल्याचं सिद्ध करण्यासाठी आयफोनचा वापर करत आहेत. आयफोनचा असा वापर तुम्ही क्वचितच ऐकला असेल... 


आपल्या सडपातळ पायांची रुंदी मोजण्यासाठी या मुली आयफोनचा वापर करत आहेत. काही मुलींनी आपल्या पायाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 


यामुळे, या मुलींवर सोशल मीडियावर टीकाही होतेय. आयफोनची लांबी १३.८ सेंटीमीटर असते... त्याहून सडपातळ होण्याची गरजच काय? असा प्रश्न आता सोशल मीडियावर विचारला जातोय.