नवी दिल्ली : रिलायन्स जिओ 4जी सर्व्हिस वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिओने 4जी सर्व्हिस लाँच केल्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत ग्राहकांना अनलिमिटेड डेटा प्लान तसेच फ्री व्हॉईस कॉल ही वेलकम ऑफर सुरु केली. मात्र आता अशी बातमी येतेय की कंपनी ही वेलकम ऑफर मार्च 2017पर्यंत वाढवण्याच्या विचारात आहे.


इकॉनमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, कंपनी 10 कोटी ग्राहकांचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेऊ शकते. 


तज्ञ मोतिलाल ओसवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या स्तरावर सुरु असलेली ही ऑफर जिओ मार्च 2017पर्यंत वाढवू शकते. यामुळे कंपनी अधिकाधिक ग्राहकांना कंपनीशी जोडू शकेल. ही ऑफर मार्चपर्यंत वाढवल्यास कंपनीला 10 कोटींचे ग्राहकांचे लक्ष्य पूर्ण करु शकेल. 


रिलायन्स जिओने नुकताच दावा केला होता की एका महिन्यात तब्बल 1.6 कोटी ग्राहक कंपनीशी जोडले गेले. पाच सप्टेंबरला ही सर्व्हिस लाँच कऱण्यात आली होती.