मुंबई : तुम्ही जिओचे यूजर्स असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. १५ एप्रिल जिओ यूझर्ससाठी प्राईम मेंबरशिप घेण्यासाठी अखेरची तारीख होती. आता १५ एप्रिलनंतर ज्या यूजर्सनी रिचार्ज केलेले नाही त्यांच्यासाठी अखेरची संधी आहे की ते माय जिओ अॅप, जिओच्या वेबसाईट अथवा जिओ स्टोरवर जाऊन रिचार्ज करु शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या आठवड्यात कंपनीने ग्राहकांसाठी ज्यांना समर सरप्राईजचा लाभ उठवता आला नाही त्यांच्यासाठी नवा प्लान आणला होता. धन धना धन ऑफर कंपनीने आणली होती. 


जर रिचार्ज केले नाही तर काय होणार?
जर जिओ यूजर्सने आतापर्यंत एकदाही रिचार्ज केलेले नसेल तर कंपनीकडून रिचार्जसाठी मेसेज वा कॉलद्वारे अलर्ट पाठवले जातील. यानंतर काही दिवसांची मुदत देत कंपनी जिओची सर्व्हिस बंद करु शकते.


आताही घेऊ शकता धन धना धन ऑफरचा लाभ
जर तुम्ही आतापर्यंत या ऑफरसाठी रिचार्ज केले नसेल तर ४०८ रुपयांचे रिचार्ज(९९+३०९) करुन ही ऑफर मिळवू शकता. आतापर्यंत कंपनी आपल्या वेबसाईटसहित माय जिओ अॅपवर प्राईम सबस्क्रीप्शन आणि धन धना धन ऑफर मिळवण्याची संधी देतेय.